ukraine news : ‘भारतीयांनो… तातडीने कीव्ह सोडा’, राजदुतांची सूचना; रशिया संहारक हल्ल्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रशिया आणि युक्रेनमध्ये भडकलेल्या युद्धाने परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. आक्रमक झालेल्या रशियाने युक्रेनवर हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. अशात भारतीय दुतावासाने युक्रेनमधील ( embassy of india in ukraine ) आपल्या सर्व नागरिकांना अत्यंत मोठी आणि महत्त्वाची सूचना केली आहे. सर्व भारतीयांनी कीव्हमधून ( indian students in ukraine ) तताडीने आजच्या आजच बाहेर पडावं, असे निर्देश कीव्हमधील भारतीय दुतावासाने दिले आहेत.

रशियाच्या फौजा युक्रेनची राजधानी कीव्हपासून आता फक्त ४० मैलांवर आहेत. रशियाच्या फौजांनी कीव्हवर हल्ले वाढवण्याची धमकी युक्रेनला दिली आहे, असे एपी या संस्थेने वृत्त दिले आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने सोमवारी बॉम्ब हल्ले केले. यासोबतच क्षेपणास्त्र हल्लेही केले. कीव्ह ताबा मिळवण्यासाठी रशिया आक्रमक झाला आहे. कीव्ह सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. यामुळे भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना कीव्ह तातडीने सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन पोलिसांनी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्यानंतर रशियानेही भारतीय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी रशियाच्या सैनिकांशी संपर्क साधावा. रशियन सैनिक त्यांना हवी सर्व मदत करतील आणि युक्रेनमधूनल त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढतील, असे रशियाने अॅडव्हायजरी जारी करत म्हटले आहे. रशियाने जारी केलेल्या अॅडव्हायजरीत यासह अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *