सर्वसामान्यांना दिलासा, डाळींच्या किंमतीत घट; मूग-उडीद डाळींचे नवीन दर, जाणून घ्या.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । एकीकडे गॅस सिलिंडर (Gas Cylinder Price), दुधासह (Milk Price) दैनंदिन वस्तूंवर महागाईचा भडका उडताना दिसत आहे. दरम्यान, यातच एक दिलासादायक बाब म्हणजे डाळींचे भाव कमी झाले आहे. डाळींच्या किमती घसरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मूग (moong dal) आणि उडीद (urad dal ) यासह अनेक डाळींच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

दरम्यान, मूग डाळीची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत एका वर्षापूर्वी याच कालावधीत 4 रुपयांनी घसरून 102.36 रुपये प्रति किलो झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत मूग डाळीची किरकोळ किंमत 106.47 रुपये प्रति किलो होती.

मंत्रालयाने सांगितले की, मे 2021 मध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत स्टॉकच्या किमतींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मिल मालक, आयातदार आणि व्यापार्‍यांना डाळींचा खुलासा करण्यासाठी जारी केलेल्या सल्ल्यानुसार किमतींमध्ये घसरण झाली.

सरकारने मे ते ऑक्टोबर 2021 दरम्यान तूर, उडीद आणि मूग मोफत आयात करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर तूर आणि उडीदच्या मोफत आयातीला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच, आयात धोरणाच्या उपाययोजनांमुळे गेल्या दोन वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

उडीद डाळीच्या दरातही घट
याचबरोबर, गेल्या काही दिवसांपूर्वी उडीद डाळीच्या दरातही कपात करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी नोंदवल्याप्रमाणे उडीद डाळीची सरासरी घाऊक किंमत 9,410.58 रुपये प्रति क्विंटल होती. तर 25 फेब्रुवारी 2021 रोजी ही किंमत 9,904.39 रुपये प्रति क्विंटल होती. यामध्ये 4.99 टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे, 24 फेब्रुवारी 2022 रोजी उडीद डाळीची सरासरी घाऊक किंमत 9,444.06 रुपये प्रति क्विंटल होती, जी 24 फेब्रुवारी 2021 रोजी 9,896.95 रुपये प्रति क्विंटल होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *