नील सोमय्यांना अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ; अटक होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा अटकूपर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने (mumbai sessions court) फेटाळला आहे. त्यामुळे नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. काल नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी नील सोमय्यांसाठी युक्तीवाद केला.

महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांवर सातत्याने आरोप करत किरीट सोमय्या यानी धुरळा उडवून दिला आहे. पण आता किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरिटी सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप करत, बाप बेटे दोनो जेल में जाएंगे असं वक्तव्य केलं होतं. तसंच नील सोमय्याचे पीएमसी बँक घोटाळ्याली प्रमुख आरोप राकेश वाधवान याच्याशी संबंध असल्याचा आरोपही केला होता. पीएमसी बँक घोटाळ्याली पैसा नील सोमय्यांनी एका प्रकल्पात गुंतवल्याचा आरोपही संजय राऊत यानी केला होता.

या प्रकरणी नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. काल जामीन अर्जावर सुनावणी झाली, आज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *