मुंबई गोवा महामार्ग ठप्प ! खेडजवळ भोस्ते घाटात डोंगराला सुरुंग लावताना दरड कोसळली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway Blocked) वाहतूक खेड जवळ ठप्प झाली आहे. खेड जवळील भोस्ते घाटात सुरुंग लावण्यात आला होता. त्यामुळे दरड कोसळली असल्यानं त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई-गोवा या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यातच खेड जवळील भोस्ते घाटात (Bhoste Ghat) सध्या रुंदीकरणाचे काम वेग घेत असताना दुपारच्या वेळेस या घाटात असणारा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला. या सुरुंगामुळे डोंगर फुटून त्याची माती ते रस्त्यावर आली. त्यामुळेच हा महामार्ग ठप्प झालाय. सध्या या रस्त्यावर मातीचा ढिगारा आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम कल्याण टोल वेज कंपनी करत आहे. दरम्यान, सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मातीचा ढिगारा दरड कोसळून मुख्य रस्त्यावर आल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हाती आलेल्या फोटोंमध्ये लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं आहे.

युद्धपातळीवर काम सुरु!
दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आता युद्धपातळीवर काम सुरु कऱण्यात आलं आहे. मात्र अनेक प्रवाशांना वाहतूक ठप्प झाल्यानं फटका बसला आहे. मुंबईत येण्यासाठी निघालेल्या आणि गावी जायला निघालेल्या अनेक गाड्यांना दरड कोसळल्यानं वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. यामुळे अनेक गाड्यांची वाहतूकही उशिरानं होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *