महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई; राज्यात पहिले रुग्ण ९ मार्च रोजी पुण्यात आढळले. त्यांच्यावर वेळीच यशस्वी उपचार करण्यात आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना पुणे महापालिकेच्या डाँ. नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या दरम्यान, पहिल्या आठवड्यात राज्यात ३३ रुग्णांची नोंद झाली. यातील बहुतांश रुग्ण हे दुबई येथे सहलीसाठी गेलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील होते. पुण्यासह यवतमाळ, मुंबई, नागपूर येथील रुग्णांचा यात समावेश होता. दुस-या आठवड्यात रुग्णांची संख्या आठने वाढली. त्यात पिंपरी-चिंचवडसह औरंगाबाद, नगर या शहरांमधील रुग्णांची संख्या मोठी होती. तिस-या आठवड्यात मात्र, मुंबई आणि सांगली येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले.
भारतानं अद्याप करोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं असलं तरी करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढं असून राज्यातील आकडा आतापर्यंत २२५ वर गेला आहे.