सावधान! 1 एप्रिलला कोरोनाबाबत चुकूनही करू नका एप्रिल फूलचे मेसेज, नाहीतर…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; पुणे ;बारामती,  : एप्रिलचा महिना म्हटलं की सगळ्यांना फूल बनवण्याचा महिना आहे. पण यंदा मात्र कोरोनामुळे देशावर खूप मोठं संकट आलं आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण तरीदेखील नियमांचं उल्लंघन झालेलं आपण पाहिलं आहे. अशात 1 एप्रिलनिमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमावबंदी लागू आहे. त्यामुळे सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे, अशा एप्रिल फूलसाठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर कोणीही बळी पडू नये अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तसेच त्या ग्रुप अॅडमिन विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी म्हटलं आहे, तसे लिखित स्वरूपाचे पत्रक ही त्यानी काढलं आहे.

त्यामुळे कोणही नियमांचं उल्लंघन करून सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, असं केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात अनेक अफवा सोशल मीडियावर वारंवार समोर येत आहेत अशा अफवांना बळी न पडू नका आणि घरी राहून आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्या. अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, एप्रिल फूल नावाखाली चेष्टा करू नये. विनाकारण देशात संचारबंदी असताना चेष्टाचा विषय केला जाता कामा नये असं आवाहान गृहमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. एप्रिल फूल नावाखाली कोणी चेष्टा केली त्यासंबधी कोणी पोलिसाकडे तक्रार केली तर पोलीस योग्य ती दखल घेतील, पण लोकांनी ही चेष्टेचा विषय करू नका परिस्थितीच गांभीर्य ओळखा असं आवाहान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *