महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । Weather : सध्या देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात चंद्रपूर, अहनदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. याठिकाणी ताापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. तापमान वढल्याने उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी ढगाळ वतावरण झाल्याने सोमवारी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.