नोकियाचा डबल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच! किंमत अवघी दीड हजार…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । सध्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता की मोबाइल फोन म्हटले की नोकिया कंपनीचाच असे काहीसे गणित होते. नोकियाचे कमी किमतीत टिकाऊ व मजबूत फोन उपलब्ध असल्याने सर्व मोबाईल शौकिनांना नोकियाच्या मोबाईलची भुरळ पडली होती.

नोकिया आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यास सज्ज झाला आहे. कारण नोकियाने नुकताच आपला 2760 फ्लिप फोन लाँच केला आहे. विशेष बाब म्हणजे या मोबाइलला दोन डिस्प्ले व कॅमेरा असून या फोनची किंमत केवळ 1,500 रुपये आहे. या फोन मध्ये इतर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. मोबाईलच्या की पॅडवर मोठे बटन दिल्याने ज्येष्ठ नागरिकांना हा फोन वापरणे सोपे जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *