महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । या आठवड्यात सोन्या-चांदीत चांगलीच तेजी पाहायला मिळाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्यात सराफा बाजारात सोने 894 रुपयांनी महागून 51,784 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 28 फेब्रुवारीला ते 50,890 रुपयांवर होते.
चांदीही 68 हजारांच्या जवळ पोहोचली
IBJA च्या वेबसाईटनुसार, या आठवड्यात चांदीमध्येही चांगली तेजी दिसून आली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून चांदी पुन्हा एकदा 68 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 65,354 रुपये होती, जी आता 67,931 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची किंमत 2,577 रुपयांनी वाढली आहे.
यंदा आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक महागले आहे सोने 2022 बद्दल बोलायचे झाले तर या वर्षात आतापर्यंत सोने 3,505 रुपयांनी महागले आहे. 1 जानेवारीला ते 48,279 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, ते आता 51,784 रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीचा विचार केला तर ती 62,035 रुपयांवरून 67,931 रुपये प्रति किलो झाली आहे. म्हणजेच या महिन्यात ती 5,896 रुपयांनी महागली आहे.
2-3 महिन्यांत 56 हजार होऊ शकते सोने
IIFL सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्यामध्ये तेजी आली आहे. याशिवाय महागाई नियंत्रणात येत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने येत्या 2-3 महिन्यांत 2100 डॉलरच्या स्तरवर पोहोचू शकते. यामुळे आपल्या येथे सोने 56 हजार पर्यंत जाऊ शकते.
केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया सांगतात की, महागाई आणि युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या वादामुळे जागतिक तणाव वाढला आहे. यामुळे सोन्याला सपोर्ट मिळेल आणि ते यंदा 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो, तर यावर्षी 80 ते 85 हजार रुपये प्रति किलोची लेवल दर्शवू शकते.