आठवड्यात तीन वेळा झेलेन्स्की यांच्या हत्येचा झालाय प्रयत्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ६ मार्च । रशिया युक्रेन यांच्यातील युद्धात रशिया मागे जाण्याच्या मूड मध्ये अजिबात नाहीच अशी परिस्थिती असून रशियन फौजांनी युक्रेनच्या अनेक महत्वाच्या शहरांवर बॉम्ब हल्ले सुरु ठेवले आहेत आणि मोठा भाग काबीज केला आहे. त्यात आलेल्या एका रिपोर्ट नुसार गेल्या सात दिवसात युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांना तीन वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. अर्थात यातील एकही प्रयत्न सफल झालेला नाही.

युद्धात दोन्ही देश एकमेकांचे नुकसान केल्याचे दावे करत आहेत. युक्रेनच्या मोठ्या भागावर कब्जा केल्याचा दावा रशियाकडून होत असताना युक्रेनने रशियाची अनेक विमाने पाडल्याचे आणि हजारो सैनिकांना ठार केल्याचे दावे केले आहेत. टाईम्स ऑफ लंडनने या काळात झेलेन्स्की यांना ठार करण्याचा प्रयत्न तीन वेळा झाल्याचे म्हटले आहे.

टाईम्स ऑफ लंडन आणि डेली मेलच्या रिपोर्ट नुसार झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी ४०० भाडोत्री सैनिक आफ्रिकेतून हायर केले गेले आहेत. वॅगनर ग्रुप नावाच्या खासगी मिलीशिया कडून झेलेन्स्की आणि अन्य २३ युक्रेनी अधिकाऱ्यांना ठार करण्यासाठी हे सैनिक युक्रेन मध्ये आणले गेले आहेत. पण युक्रेनवर हल्ला करण्यास विरोध असलेल्या काही रशियन हेरांनीच झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी रचल्या गेलेल्या कटांची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांना दिल्यामुळे पुतीन यांचा डाव यशस्वी होऊ शकला नसल्याचा दावा केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *