महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ मार्च । राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आता आटोक्यात येत असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. या आठवड्यात दुसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. या अगोदर 2 मार्चला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. काल दिवसभरात राज्यात 225 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 461 बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 18 एप्रिल 2020 नंतर राज्यात आज सर्वात कमी बाधितांची नोंद झाली आहे.
आज राज्यात शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. आतापर्यंत राज्यात 77 लाख 17 हजार 823 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे. सध्या राज्यात 28 हजार 975 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.