![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । Gold Rates Today : आज भारतात सोन्याचे दर (gold rates) 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 10,000 रुपयांनी वाढले. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
आज सोन्याचे भाव
आज भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 49,400 रुपये आणि 24 कॅरेटचा 53,890 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,400 रुपये होता, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 50,710 रुपये होता. केरळमध्ये सोन्याचा दर 49,400 रुपये आहे. रशिया युक्रेन युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. ताज्या रिपोर्टनुसार, S&P ने 52 रशियन कंपन्यांचे रेटिंग कमी केले आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई – 49,400 53,890
पुणे 49,480 53,950
नागपूर 49,550 53,940
नाशिक 49,480 53,950
दिल्ली 49,400 53,890
सुरत 49,450 53,890
केरळ 49,400 53, 890
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.