IND vs SL: दुसऱ्या टेस्टमध्ये ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू; असं असेल Playing 11

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिल्यानंतर आता टेस्ट सिरीजमध्येही पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विज मिळवला आहे. पहिला टेस्ट सामना एक डाव आणि 222 रन्सनी जिंकला. तर कर्णधार रोहित शर्मा टेस्ट सिरीज जिंकण्याचाही पूर्ण प्रयत्न करणार आहे. यामुळे दुसऱ्या टेस्टसाठी रोहित टीममध्ये मोठे बदल करणार असल्याची शक्यता आहे.

नव्या ओपनरसोबत उतरणार रोहित
पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा ओपनिंगसाठी मयांक अग्रवालसोबत उतरला होता. मात्र यावेळी त्यामध्ये बदल करून दुसऱ्या टेस्टसाठी तो शुभमन गिलसोबत ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. केएल राहुल दुखापतीमुळे श्रीलंकेच्या सिरीजमधून बाहेर आहे.

पहिल्या टेस्ट सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर हनुमा विहारी तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली उतरले होते. यामध्ये शक्यतो बदल केला जाणार नाही. त्याचप्रमाणे पाचव्या नंबरवरही ऋषभ पंतच उतरणार आहे.

अक्षर पटेलला संधी
पहिल्या सामन्यात जयवंत यादवला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला दोन्ही डावात एकंही विकेट मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या जागी स्पिनर अक्षर पटेलला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *