Mini Portable AC: AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळणार AC चा गारवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । उन्हाचा पारा वाढल्याने गरमीमुळे झोप पण लागत नाही. मग एसी घेण्याचा विचार डोक्यात भिरभिरू लागतो. मग ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. एसी घ्यायचा म्हणजे खर्च भरपूर येणार असा विचार पटकन डोक्यात येतो. तुम्ही देखील कमी बजेटमुळे एसी खरेदी करणे टाळत असाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. पण आता तुम्ही अवघ्या ४०० रूपयात मिनी पोर्टेबल एसी घरी आणू शकता. खास गोष्ट म्हणजे हे एका बॉक्समध्ये येतात व तुम्ही कोठेही घेवून जाऊ शकता.

तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. हे डिव्हाईस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते. त्याची किंमत ४०० रुपयांपासून सुरू होते आणि २००० रुपयांपर्यंत जाते. हे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल निवडू शकता.

हे कस काम करत
जर तुम्हाला हे पोर्टेबल एअर कंडिशनर चालवायचे असेल तर तुम्हाला ड्राय आईस किंवा पाणी वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल. जर तुम्ही देखील ते विकत घेतले तर ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे आणि ते कमी वीज वापरते. जे लोक टेबलवर काम करतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *