Petrol Diesel Prices Today: आठवड्याच्या सुरुवातीला काय आहे इंधन दर, तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Prices) नवे रेट जारी केले आहेत. आजही महानगरात इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरात मागील चार महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात बदल केलेला नाही. तरीही मुंबईत पेट्रोल आधीच वाढत्या किमतीत 110 रुपयांजवळ आहे. सोमवारीही दर स्थिर आहे. परंतु लहान शहारात पेट्रोल-डिझेल दर बदलला आहे.

चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर

– दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

– मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

पुणे 109.45 रुपये 92.25 रुपये
मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
नाशिक 109.49 रुपये 92.29 रुपये
नागपूर 109.71 रुपये 92.53 रुपये
अहमदनगर 110.15 रुपये 92.92 रुपये
औरंगाबाद 110.38 रुपये 93.14 रुपये
रत्नागिरी 110.97 रुपये 93.68 रुपये
रायगड 109.48 रुपये 92.25 रुपये
परभणी 112.49 रुपये 95.17 रुपये
पालघर 109.75 रुपये 92.51 रुपये
सांगली 110.03 रुपये 92.83 रुपये
कोल्हापूर 110.09 रुपये 92.89 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *