Money Laundering Case : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन फेटाळला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १४ मार्च । आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगातच होणार आहे. सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर PMLA न्यायालयात सुनावणी झाली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांना 2 नोव्हेबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास चार महिन्यापासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत.

मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शी सादर करण्यात आलेले पुराव्यावरुन आरोपी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे सिद्ध होतेय, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश आरएस रोकडे यांनी नोंदवले. तसेच साक्षीदारांच्या विधानांमध्ये विरोधाभास असताना, या टप्प्यावर जामीनाचा विचार केला जाऊ शकत नाही, असेही रोकडे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *