महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । होळीच्या सणापूर्वी सर्वसमान्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. होळीपूर्वी पाच गोष्टींमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम सर्वसमान्यांच्या बजेटवर होणार आहे. या पाच गोष्टींमध्ये ईपीएफच्या व्याजदरात करण्यात आलेली कपात, दूधाचे वाढलेले भाव याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. सर्वसामान्यांच्या बजेटवर पाच गोष्टींचा मोठा परिणाम होणार आहे.
या महिन्याच्या 12 तारखेला ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने आर्थिक वर्ष 2021-22 साठी पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवरली व्याजदरात कपात करत ते 8.1 टक्के केले आहे. त्याचा फटका सुमारे 6 कोटी खातेधारकांना बसणार आहे. या बदलाला अद्याप वित्त मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओने खातेधारकांना 8.5 टक्के व्याज दिले होते.
या महिन्याची सुरुवातच दुध दरवाढीने झाली. अमूल, महानंद, पराग, णदर डेरीसह इतर दुधउत्पादकांनी दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जारी केली आहे. त्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत होलसेल भावावर आधारित महागाई वाढून 13.11 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. त्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसत आहे. सलग आकराव्या महिन्यात होलसेल प्राइजवर आधारीत महागाईत वाढ झाली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्ली एनसीआरसह अनेक शहरात सीएनजीच्या किमतीत 50 पैशांपासून एक रुपयाची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सीएनजी किंमत 57.01 रुपये प्रतिकिलोग्रॅमवरून 57.51 रुपये प्रतिकिलोग्रॅम झाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या पाच गोष्टीचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार असून त्यांचा खिशाला कात्रई लागली आहे.