महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka 2nd Test) 238 रननी दणदणीत विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 447 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 208 रनवर ऑल आऊट झाला. पूर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी मालिका खेळत असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma)याने या मालिकेदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली. दरम्यान, रोहित शर्मा ने अजिंक्य रहाणे(ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara) यांची कसोटी कारकिर्द संपुष्टात आली असल्याचे संकेत दिले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर रोहितने माध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांने संघातील खेळाडूंचे तोंडभरुन कौतुक केले. विशेषतः श्रेयस अय्यरचे.तो म्हणाला, ”श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील फॉर्म त्याने कसोटीतही कायम राखला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढायची आहे, याची जाण त्याला होती. त्याने त्याचे कौशल्य दाखवून दिले. संघासोबत तो जेव्हा आणखी प्रवास करेल, तेव्हा त्याची कामगिरी आणखी सुधरत जाईल. रिषभ पंतही प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावतोय. त्याच्या खेळातून आत्मविश्वासही जाणवतोय. अशे उद्गार त्याने यावेळी काढले.
तसेच तो पुढे म्हणाला, श्रेयस अय्यरने दिलेल्या संधीचा उपयोग करुन घेतला.त्यानंतर अंतिम कसोटीत त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. बंगळुरूच्या पहिल्या डावात तो शतकाच्या जवळ असल्याचं दिसत होतं, पण त्याला दुस-या टोकाकडून साथ मिळाली नाही. आणि त्याने ते उत्तम केलं.
अनुभवी कसोटीपटू अजिंक्य रहाणेच्या जागी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. तर चेतेश्वर पुजाराची जागा हनुमा विहारीला देण्यात आली. मात्र, अय्यरने शानदार फलंदाजी करताना दोन्ही खेळाडूंची उणीव भरून काढली.
यासोबतच, आर अश्विनवरही भाष्य केले. आर अश्विन हा ऑल टाईम ग्रेट आहे, हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याला गोलंदाजीची जेव्हा जेव्हा संधी दिली, तेव्हा त्याने मॅच विनिंग कामगिरी करून दाखवली. त्याच्यात आणखी बरीच वर्ष क्रिकेट खेळण्याची ऊर्जा आहे. त्यामुळे भविष्यात त्याची गरज भासणार आहे. पिंक बॉल कसोटी आव्हानात्मक असते,”असे रोहित म्हणाला.