महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका देशाला बसताना दिसतोय. कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रित करण्यात सरकारला यश आलं मात्र महागाई नियंत्रित ठेवण्यात मात्र सरकार अपयशी ठरलेलं दिसंतय कारण सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या दरानं उच्चांक गाठलाय. किरकोळ महागाईचा दर 6.07 टक्क्यांवर पोहोचलाय तर घाऊक महागाई 13.11 टक्के झाली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेनं व्याजदर वाढवण्याबाबत विचार सुरू केल्याची माहिती मिळतेय.