महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । पुणे – सातारा मार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. साताऱ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणारी शिवशाही बसने अचनाक पेट घेतला. महामार्गावरील निगडे गावाजवळ ही घटना घडली.यावेळी वाहतूक काहीकाळ ठप्प होती. (Burning bus on Pune-Satara highway)
शिवशाही बसला आग लागल्यानंतर पुणे – सातारा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. यावेळी आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले.चालक आणि वाहकासह सर्व प्रवासी सुखरूप बस बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांकडून तात्काळ मदत करण्यात आली.