गुगल पे,’फोन पे’ला ‘टाटा’देणार टक्कर ; लवकरच दाखल करणार सुपर अॅप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (UPI) म्हणजेच यूपीआय आता अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे आणि पेटीएम नंतर आणखी एक दिग्गज कंपनी या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. टाटा समूह लवकरच यूपीआय क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी कंपनीने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडे परवानगी मागितली आहे. एनपीसीआयकडून मंजुरी मिळताच कंपनी त्यांची यूपीआय सेवा सुरू करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूहाने थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून सेवा सुरू करण्यासाठी एनपीसीआयकडे अर्ज केला आहे. ही सेवा आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या सहकार्याने सुरू केली जाऊ शकते. याशिवाय इतर बँकिंग संस्थांशीही बोलणी सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीसीआयकडून मंजुरी मिळताच टाटा समूह पुढील महिन्यापर्यंत ही सेवा सुरू करू शकते.

यूपीआय पेमेंट क्षेत्रात टाटा ग्रुपची पेटीएम, गुगल पे, फोनपे आणि अॅमेझॉन पे सारख्या कंपन्यांशी थेट स्पर्धा असेल. फोन पेचा सध्या यूपीआय पेमेंट मार्केटमध्ये सर्वात मोठा वाटा आहे. यानंतर गुगल पे आणि इतर कंपन्यांचा क्रमांक येतो.

टाटा समूह सुपर अॅपला डिजिटल क्षेत्रात उतरवण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, ग्रुप एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान हे सुपर अॅप लाँच करू शकते. या अॅपला टाटा न्यू असे नाव देण्यात आले आहे. टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांच्या सेवा या अॅपवर उपलब्ध असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *