महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ मार्च । राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत आहेत. मनी लॉन्डिरग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांनाला ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून त्यांना ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.
नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.
https://twitter.com/barandbench/status/1505821419795632128?s=20&t=BgPjoH7QAAXF7Q1by8v6_w