LPG Price Hike: महागाईचा वणवा ! पेट्रोल, डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । तब्बल १३७ दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. तसेच आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे.

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *