महाराष्ट्र 24 |सातारा| विशेष प्रतिनीधी; सातारा शहराच्या पुर्वभागात असलेल्या विलासपूर,शाहूनगर ,गोळीबार मैदान, जगतापवाडी आणि त्रिशंकू भागात पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, राहुल पाटोळे आणि अनेक युवा कार्यकर्ते सध्या स्वच्छता मोहीम आणि जंतुनाशकाची फवारणी करण्यात व्यस्त आहे. मुलभूत सोई सुविधांपासून वंचित असणाऱ्या या परिसरात कोरोनाची धास्ती चांगलीच असून प्रशासनाच्या मदतीशिवाय युवा टीम स्वयंस्फूर्तीने सक्रिय योगदान देत आहे.
परिसरातील सर्वच सोसायट्यांमध्ये जंतुनाशक फवारणी उत्स्फूर्ततेने युवा कार्यकर्ते करत आहेत.प्रत्येक काँलनीत जाऊन स्थानिकांना मदतीला घेऊन ही जंतुनाशक फवारणी केली जात आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असल्याचे आशुतोष चव्हाण,रवी पवार यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले. यात राहुल पाटोळे, बंटी सुर्वे,सोहेल निकम, धनेश खुडे, विनोद यादव,प्रकाश घुले, सचिन शिंदे, दारा टोणपे,विनोद मोरे, सतीश नलावडे, निलेश नलावडे यांच्या मित्रांची टीम गेले पाच दिवस सकाळी ९ ते दु.१ आणि व सायं.६ ते ९ वाजेपर्यंत औषध फवारणी करत रस्त्याच्या कडेने जंतुनाशक फवारणी, डीडीटी पावडर मारण्यात व्यस्त आहे.
जि.प.सदस्या मधु कांबळे, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, विलासपूर ग्रामपंचायतीने ही त्यांना जंतुनाशक औषधे उपलब्ध करून दिली .