आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच सरसावले!; जिल्ह्यातील सरपंच एक महिन्यांचे मानधन देणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24; सातारा । विशेष प्रतिनिधी। सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना शासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. गाव पातळीवर जंतूनाशक फवारणी, स्वच्छता , मास्क वाटप , साबण वाटप , बाहेरून आलेल्या व्यक्तींना क्वारनटाईन करण्यात सरपंच, सदस्य, ग्रामसेवक , कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. याच धर्तीवर शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ख्यातकीर्त असलेल्या सातारा जिल्ह्यातील तब्बल १३५७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. तब्बल 33 लाख 54 हजार 750 एवढा निधी जिल्हयाच्या सरपंचांच्या मानधनाची रक्कम शासनास मदत निधी म्हणून देत असल्याची माहिती सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र 24 ला दिली. सरपंच परिषदेच्या या स्तुत्य निर्णयाचे स्वागत तसेच कौतुक सर्वोतोपरी होत आहे.

सातारा जिल्हातील ११ तालुक्यातील एकूण १ हजार ३५७ सरपंचांनी तब्बल ३३ लाख , ५४ हजार ,७५० रूपयांचा निधी कोरोनाचे संकट निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-१९साठी स्वच्छेने देण्याची तयारी दर्शविली आहे. सरपंचांनी क्रांतीकारक जिल्हयाचा वारसा जोपासला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी व्यक्त केली. तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन साबळे म्हणाले की, सर्वच जिल्ह्यातील सरपंचांनी या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होणे या परिस्थितीत गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक होऊन संकटांना सामोरे जात असताना स्वेच्छेने राज्यभरातील सरपंचांनी समाजप्रतीचे आपले दायित्व निभावावे!

सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाकिनी सावंत , तसेच आनंद जाधव , रणजित पाटील , सतिश इंगवले . चंद्रकांत सणस , समाधान पोकळे , आशा जाधव , आल्पना यादव , सुतिना पाटणे , संतोष शेळके , ऍड मंगेश जगताप, मनिषा घाडगे, अविनाश पाटील, जीवन जाधव, सुरेखा डुबल, ऍड अनिल सोनमळे , कविता देशमुख , बजीरंग चौधरी , धनश्री शिंदे, अजित माने, वर्षा भोसले, संतोष शेडगे, वैशाली मोकाशी , पप्पराजे भोसले , शितल देशमुख , प्रशांत गोरड , उज्वला किसवे , अशोक दुधाणे , वैशाली उत्तेकर , शंकरबापू खापे , सुचिता मोहिते, रेश्मा यादव,राजेंद्र पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सहमती दर्शविली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *