महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. ऐन मोसमात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू धोक्यात आला आहे.
कोकण वगळता राज्यात उन्हाचा चटका कायम
उर्वरित राज्यात पुढील 4 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हा पारा असाच राहणार असून, 4 दिवस उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत.
अवकाळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत
निकषात नसणा-या अवकाळीबाधित शेतक-यांनाही मदत मिळणार आहे. निकषात न बसणा-या शेतक-यांना विशेष बाब म्हणून सुमारे 1400 कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय होणारा आहे.
तसेच पुढील खरीप हंगामापासून मदतीच्या निकषामध्ये बदल केला जाणार आहे…तीन दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस होऊन झालेल्या नुकसानीचीही शेतक-यांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.