Mahada Home : आमदारांना मुंबईत म्हाडाची घरं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात वरळीतील बीडीडी चाळीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आल्याची घोषणा केली आहे. दरम्यान यापुढे सिद्धार्थ नगर नावाने गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्राचाळीला ओळखले जाईल असेही जाहीर केले. तसेच मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी ३०० एचआयजीची घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे दिली मुंबईतील आमदारांना वगळून ग्रामीण भागातील आमदारांना जातील, असे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.

ग्रामीण विभागातून खूप आमदार मुंबईत येतात. कुठल्या पक्षाचे ते आमदार आहेत, ते महत्त्वाचे नाही, पण त्यांच्यासाठीही आपले उत्तरदायित्व असते. आपण सगळ्यांसाठी जबाबदार असतो. त्यामुळे गोरेगाव येथे एका भूखंडावर ३०० खोल्या निर्माण करुन त्या आमदारांना देण्याचा विचार म्हाडाने केला आहे. मुंबईत ज्या आमदारांना घर नाही किंवा त्यांचे मुंबईत वास्तव्य नाही आणि जे मुंबईतील आमदार नाहीत अशांसाठी ही योजना नसणार आहे. मुंबई महानगर क्षेत्राबाहेर राहणाऱ्या सगळ्या आमदारांना मुंबईत घर मिळावे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मी जाहीर करत आहे. यासाठी जमीन म्हाडाच्या ताब्यात आहे, त्यामुळे ३०० आमदारांना घरे देण्याची योजना आखत असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड दिली.

डोक्यावर छत असावं म्हणून सामान्य माणूस हक्काच्या घरासाठी आयुष्यभर आटापिटा करतो, तरीही त्याला घरं घेणं शक्य होत नाही. असं असताना राज्यातल्या 300 आमदारांना मात्र मुंबईत म्हाडाची घरं मिळणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रावरून एडीआर संस्थेनं जो अहवाल प्रकाशित केला होता, त्यानुसार राज्यातील विधानसभेतले 93 टक्के म्हणजे 266 आमदार कोट्यधीश आहेत. असं असताना या कोट्यवधींची संपत्ती असलेल्या आमदारांना मुंबईतल्या गोरेगावात हजार ते बाराशे फुटाचं घर मिळणार आहे. आमदारांना मुंबईत घरं आणि घरांचं भाडं परवडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. असं असेल तर घर घेणं सोडा, पण भाडंही परवडत नसलेल्या सामान्य माणसासाठी सरकार काय करणार आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *