महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय रविवारीही वर्ग भरवण्यासही शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. उजळणी घेण्यासाठी शाळा सुरू ठेवण्यास शिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे परवानगी दिलीय. वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.