IPL 2022, SRH vs RR : आज राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे सामना ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ मार्च । आयपीएलच्या सामन्यांमध्ये अवघ्या दोन दिवसांत रंगत दिसू लागली आहे. सोमवारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या नव्या दोन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. ज्यानंतर आता आज देखील एका दमदार सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH vs RR) या संघामध्ये आज सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानची भिस्त यंदाही संजू सॅमसनकडे असून हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून केन विल्यमसन मैदानात उतरेल.

हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांनी महालिलावात दमदार खेळाडूंना विकत घेतल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.

कधी आहे सामना?

आज 29 मार्च रोजी होणारा हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

कुठे आहे सामना?

हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर रंगणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *