भावानेच विकेट काढल्याचा हार्दिक पंड्याला दुःख ?; म्हणाला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या लीगमध्ये केवळ दोन टीम नव्हे तर दोन भाऊ आमनेसामने भिडत असल्याचं चित्र चाहत्यांनी सोमवारच्या सामन्यात पाहिलं. गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात हा सामना होता. आणि या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या विरूद्ध क्रुणाल पंड्या एकमेकांविरोधात मैदानात होते. याच सामन्यात कृणालने त्याचा भाऊ हार्दिक पंड्याची विकेट काढली.

11व्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्या गोलदाजी करण्यासाठी आला. यावेळी कृणाल पंड्याच्या पहिल्या बॉलवर हार्दिकने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि बॉल हवेतच राहिला. हा बॉल फिल्डींगला उभ्या असलेल्या मनीष पांडेकडे गेला आणि त्याने हा सोपा कॅच टिपला. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने या सामन्यात 28 बॉल्समध्ये 33 रन्सची खेळी केली.

या सामन्यानंतर कृणालने विकेट घेतल्यासंदर्भात हार्दिक पंड्या म्हणाला, जर आम्ही हरलो असतो तर कृणालच्या हातून आऊट झाल्यावर वाईट वाटलं असतं. पण आता कुटुंब न्यूट्रल आणि आनंदी असेल. त्याने मला बाद केलं आणि मी सामना जिंकला.

दरम्यान हार्दिक पांड्या आऊट झाल्याने कृणाल उदास झाल्याचंही पाहायला मिळालं. त्याने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कृणाल पांड्याने तो आऊट झाल्याचा आनंद साजरा केला नाही. दोन सख्खे भाऊ मुंबई टीमधून एकत्र खेळायचे मात्र त्यांना मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये त्यांना रिटेन केलं नाही. त्यामुळे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध मैदानात खेळताना या सामन्यात दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *