10वी आणि 12वीचे निकाल लांबणीवर ? शिक्षक आक्रमक भूमिकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । 10th and 12th exam result :10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 10वी आणि 12वीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण 25 हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे बोर्डाकडे परत पाठवलेत.

कायम विनाअनुदानित शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नाहीत, असा पवित्रा अनेक शिक्षकांनी घेतला आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *