महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी-चिंचवड यांचा साल 2021 -23 साठीचा पदग्रहण समारंभ दिनांक 20 /3 /2022 रोजी संध्याकाळी चंद्रपूर लॉन्स ,आळंदी रोड ,पुणे .येथे दिमाखदारपणे साजरा झाला .JSGn श्री अतुल पोपटलाल धोका यांनी अध्यक्षपदाची तर सौ सुनीता अतुल धोका, यांनी फर्स्ट लेडी पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या कमिटीतील बाकी सदस्यांची ही शपथ झाली, त्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट श्री प्रशांतजी गांधी ,सेक्रेटरी श्री कमलेशजी चोपडा ,जॉइंट सेक्रेटरी श्री गिरीश जी कोठारी आणि खजिनदारपदी श्री धवलजी पटेल यांनी शपथ घेतली, इतर कमिटी सदस्यांची देखील शप्पथ झाली, महाराष्ट्र रिजनचे अध्यक्ष JSGn श्री सचिन भाई शहा यांनी अध्यक्षांना व इतर पदाधिकारी ना शपथ दिली आणि अध्यक्षयाना पिन प्रधान केली , त्यानी ग्रुपच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा गौरव करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . त्यानंतर माजी अध्यक्ष श्री पंकजजी गुगळे आणि सौ गीता गुगळे यांनी चार्टर आणि ट्रॉफी अध्यक्षांना प्रदान केली.
याप्रसंगी JSGIF चे आयडी बीरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजनचे श्री दिलीप भाई मेहता ,श्री अमोल भाई जव्हेरी, श्री दिलीपजी चोर बेले तसेच पुणे झोन चे श्री युवराज भाई शहा, श्री आशिष भाई शहा ,सौ चंचलाजी कुचेरिया, जैन सोशल डायमंड ग्रुपचे फाउंडर प्रेसिडेंट श्री दीपकजी डागा ,श्री नरेश भाई शहा, श्री सुनीलजी गांधी ,श्री अनुपजी शहा ,श्री सुनीलभाई शहा ,श्री नयनजी भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते ,सेक्रेटरी श्री कमलेश जी चोपडा यांनी चालू वर्षात झालेल्या विविध कार्यक्रमांचा एक व्हिडिओ सादर केला ,आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणात श्री अतुल धोका यांनी सर्वांच्या सहकार्याने उत्तमोत्तम कार्य करण्याचे आयोजन सांगितले , या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आणि आकर्षक म्हणजे श्री शशिकांत जी पेडवाल (डु. अमिताभ बच्चन). ऑर्केस्ट्रा सोबत त्यांची डायलॉग बाजी आणि गाण्याच्या तालावर लोकांनी खूप एन्जॉय केला. होळी चे निमित्त साधून सर्व सभासदांनी एकमेकांना रंग लावून गाण्याच्या तालावर जोरदार होळी साजरी केली. स्वादिष्ट भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.