महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । देशासह राज्यात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये आज आठव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. नव्या इंधन दरानुसार पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 115 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर 97.46 रुपये इतका झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने यााच मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.