तीन दिवसांच्या घसरणीला लागला ब्रेक, जाणून घ्या आज कितीने महागले मौल्यवान धातू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । कमाॅडिटी बाजारात मागील तीन दिवस सुरु असलेल्या सोने आणि चांदीमधील घसरणीला ब्रेक लागला आहे. आज बुधवारी सोने दरात ३०० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव ४०० रुपयांनी वाढला. यापूर्वी सलग तीन सत्रात सोने ९२६ रुपयांनी स्वस्त झाले होते. तर मागील तीन दिवसांत चांदीमध्ये तब्बल २०८० रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१५९४ रुपये असून त्यात ३०५ रुपयांची वाढ झाली. आजच्या सत्रात सोन्याचा भाव ५१८२० रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६७३४७ रुपये इतका वाढला असून त्यात ४०० रुपयांची वाढ झाली. यापूर्वी कमाॅडिटी बाजारात शुक्रवार, मंगळवार आणि सोमवार असे तीन दिवस सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी २९ मार्च रोजी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६५० रुपये इतका आहे. त्यात १०० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ५१९८० रुपये इतका खाली आला. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ५१९८० रुपये इतका आहे.

आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७९२० रुपये इतका असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२२८० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१९८० रुपये इतका आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव २०० ते २५० रुपयांनी कमी झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *