महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्याती कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. येणाऱ्या काळात मनसेची राजकीय वाटचाल काय असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं आणि राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीय समीकरणं वाढल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राज्यात पुन्हा राजकीय घुसळण होत आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलंय. त्यांनी नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. (Sandeep Deshpande Speaks on Sharad Pawar)
ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला,कधी काँग्रेस मध्ये कधी काँग्रेस च्या बाहेर,1999 मध्ये परदेशी च्या मुद्द्यांवर वेगळा पक्ष,2014 मध्ये न मागता भाजप ला पाठिंबा,2019 मध्ये थेट शिवसेनेच्या मांडीवर, आमच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करण्या आधी स्वतःचा चेहरा आरश्यात नक्की बघा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 3, 2022
काय म्हणाले संदीप देशपांडे?
ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला,कधी काँग्रेस मध्ये कधी काँग्रेस च्या बाहेर,1999 मध्ये परदेशी च्या मुद्द्यांवर वेगळा पक्ष,2014 मध्ये न मागता भाजप ला पाठिंबा,2019 मध्ये थेट शिवसेनेच्या मांडीवर, आमच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करण्या आधी स्वतःचा चेहरा आरश्यात नक्की बघा!