महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । इंधन दरवाढीने (Fuel Rate) पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल (Petrol) प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल (Diesel) ६.६३ रुपयांनी महागले. शहरात शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर ११७.४, तर डिझेल ९९.७७ रुपये झाले. यामुळे डिझेलदेखील आता १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
दिवाळीपूर्वी पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाचे दर २२ मार्चपर्यंत कायम होते. मात्र, आता पुन्हा दरवाढ होऊ लागली असून इंधनाचे दर पुन्हा दिवाळीपूर्वी असलेल्या किमतीवर येऊन पोहोचले आहेत.
गेल्या दहा दिवसांमधील स्थिती, पेट्रोल ११६.२० तर डिझेल ९८.९४ रुपये प्रतिलिटर
गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल ५.८५, तर डिझेल ५.०७ रुपयांनी महागले