राज ठाकरेंच्या टीकेला पुतण्या आदित्य ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, ”मनसे ही…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । कोरोनाच्या दोन वर्षांनंतर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melawa 2022) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विधानसभा निवडणुकांनंतर (assembly elections) भाजप (BJP) सोबत न राहता महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं यावरुन राज ठाकरे यांनी टिका केली. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी मनसेवर केली आहे. मनसे ही भाजपची‘सी’ टीम असल्याची टीका (criticized) आदित्य ठाकरेंनी केलीय.

ई सकाळनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. काही पक्षांना मी टाइमपास पक्ष म्हणत होतो. आता तरी त्यांना थोडे काम मिळाले आहे. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम, तर मनसे ही ‘सी’ टीम आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही हे कळल्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षाचा दावा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा चार भिंतीआड का झाली? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यातील विधानसभेची मागील निवडणूक आठवा, सोबत कोण होतं आणि विरोधात आहे. पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच. निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार कसा झाला की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ठरली होती. आधी जाहीर सभेत का नाही बोलले. अमित शाह यांच्याशी बंद दाराआड का बोलणं केलं? दुसरीकडे अशी चर्चा झाली नसल्याचे अमित शहा यांनी सांगितलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

महाराष्ट्राने असं राजकारण पाहिलं नाही. एकमेकांना टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं होतं. मग सरकार महाविकास आघाडीचं का? मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला मतं नाही दिली. राज्यातील जनतेशी गद्दारी का केली? मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही काय शिक्षा देणार? अशी विचारणा राज ठाकरे यांनी जनतेला केली.

महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये, पहिलं मंत्रिपद छगन भुजबळ यांना जाहीर केलं तेही दोन वर्षे जेलमध्ये होते. हे सगळं नाकावर टीच्चून केलं जातं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *