![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली असली तरी, भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम आहे.
आज (सोमवार) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. देशाची राजधानी दिल्लीत आज म्हणजेच, 4 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झालीय. यासह दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय.
14 दिवसांत पेट्रोल 8.40 रुपयांनी महागलं
22 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 वेळा वाढ करण्यात आलीय. दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नव्हता, त्यामुळं देशभरातील किमती स्थिर होत्या. बहुतांश दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झालीय.
कोणत्या दिवशी पेट्रोलचे दर किती वाढले?
तारीख किती रुपयांनी वाढलं
22 मार्च 80 पैसे
23 मार्च 80 पैसे
25 मार्च 80 पैसे
26 मार्च 80 पैसे
27 मार्च 50 पैसे
28 मार्च 30 पैसे
29 मार्च 80 पैसे
30 मार्च 80 पैसे
31 मार्च 80 पैसे
02 एप्रिल 80 पैसे
03 एप्रिल 80 पैसे
04 एप्रिल 40 पैसे