महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ एप्रिल । संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्यांच्यावर मोठी (ED Action on Sanjay Raut) कारवाई केली आहे. ईडीने त्यांची अलिबागमधील भूखंड आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त (ED Attaches Sanjay Raut Property) केलाय. त्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असत्यमेव जयते, असं ट्विट केलं आहे.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने संजय राऊतांवर थेट कारवाई केली असून त्यांची मालमत्ता जप्त केली होती. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांच्यावर १ हजार ४८ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा आरोप होता. यामध्ये संजय राऊतांचा सहभाग असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांनी ईडीकडे तक्रार देखील केली होती. याप्रकरणी आता संजय राऊतांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि मुंबईतील दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
ईडीने त्यांची कबर खणायला सुरुवात केली आहे. त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे. ईडीने आरोप सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडून माझी सर्व संपत्ती भाजपच्या नावावर करेन, असा खुलं आव्हान देखील संजय राऊतांनी ईडीला दिलं आहे. तसेच मला यापूर्वी कुठलीही नोटीस दिलेली नाही. ईडीने थेट ही कारवाई केली आहे. माझ्यावर ५५ लाखांचं कर्ज देखील आहे. त्याबाबत मी शपथपत्रात माहिती दिली आहे. माझ्या राहत्या घरावर ईडीने कारवाई केली आहे, असं संजय राऊत माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.