IPL 2022 : पॅट कमिन्सच्या वादळाने मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण ; रेकाॅर्ड खेळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) एक हाती विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सच्या पॅट कमिन्सने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ज्यामध्ये त्याने एका षटकात 35 धावा करून कोलकाताला एक मोठा विजय मिळवून दिला. कमिन्सने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी केएल राहुलच्या नावावर विक्रम होता.(IPL 2022 Pat Cummins Record)

पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीत केवळ 15 चेंडू खेळले आणि 54 धावा केल्या. आपल्या धडाकेबाज खेळीत त्याने 6 षटकार आणि 4 चौकार झोडले आहेत. सामना एका निर्णायक टप्प्यावर आला होता, पण पॅट कमिन्सने जोरदार फटकेबाजी करत संपूर्ण सामनाच केकेआरच्या बाजूने ओढून आणला‌.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम पाहिला तर आता केएल राहुल आणि पॅट कमिन्स यांच्या नावावर संयुक्तपणे हा विक्रम आहे. तर पहिल्या पाचमध्ये तीन भारतीयांच्या नावावर हा विक्रम आहे. विशेष म्हणजे केकेआरकडून खेळताना तीन खेळाडूंनी हा विक्रम केला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम

केएल राहुल – 14 चेंडू – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – 8 एप्रिल 2018

पॅट कमिन्स – 14 चेंडू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ६ एप्रिल २०२२

युसूफ पठान – 15 चेंडू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स – 24 मे 2014

सुनील नरेन – 15 चेंडू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स – 7 मे 2017

सुरेश रैना- 16 चेंडू – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – 30 मे 2014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *