वसंत मोरे यांना ‘शिवतीर्थ’वरून बोलावणं, राज ठाकरेंची भेट घेणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ एप्रिल । मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत असलेले पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना अखेर शिवतीर्थवरुन बोलावणे आले आहे. त्यानुसार वसंत मोरे येत्या सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. वसंत मोरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी वसंत मोरे (Vasant More) यांनी गुरुवारी रात्री राज ठाकरे यांना मोबाईलवरून मेसेजही पाठवला होता. मात्र, राज ठाकरे यांनी त्या मेसेजला कोणताही रिप्लाय दिला नव्हता. मात्र, त्यानंतर काही वेळातच मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. त्यामुळे आता सोमवारी शिवतीर्थवरील बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *