IPL 2022 : गुजरातच्या खेळाडूची पहिल्याच मॅचमध्ये कमाल ; आर आश्विन ची भविष्यवाणी खरी ठरली,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या बॉलवर पंजाब किंग्जचा (Punjab Kings) पराभव केला. गुजरातच्या या विजयात पहिलीच आयपीएल मॅच खेळणाऱ्या बी. साई सुदर्शनचा (B Sai Sudarshan) महत्त्वाचा वाटा होता. पहिली विकेट झटपट गेल्यानंतर तीन नंबरवर बॅटींगला आलेल्या सुदर्शननं शुभमन गिलला (Shubman Gill) चांगली साथ दिली.

गिल आणि सुदर्शन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 101 रनची भागिदारी करत मॅचवरील गुजरातची पकड निसटू दिली नाही. सुदर्शननं यावेळी 30 बॉलमध्ये 45 रन केले. त्याने यामध्ये 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. चेन्नईच्या 20 वर्षांच्या या खेळाडूची टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) जोरदार प्रशंसा केली होती. अश्विननं 9 महिन्यांपूर्वी सुदर्शनबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

 

सुदर्शननं सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत सर्वांना प्रभावी केले होते. त्यानं त्या स्पर्धेत 7 मॅचमध्ये 182 रन केले होते. त्याचबरोबर तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही (TNPL) त्यानं आक्रमक खेळ करत अश्विनचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुदर्शननं टीएनपीएलमध्ये 43 बॉलमध्ये 87, 24 बॉलमध्ये नाबाद 80 रन रेले होते. अश्विननं त्याच्या खेळाची प्रशंसा करत सुदर्शन टी20 क्रिकेटसाठी तयार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचबरोबर तामिळनाडू क्रिकेट टीमनं त्याला संधी द्यावी असंही ट्विट अश्विननं गेल्या वर्षी जुलै महिन्यात केलं होतं. सूदर्शनच्या आयपीएल पदार्पणानंतर अश्विनचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

साई सुदर्शन तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चेपॉक सुपर गिल्लीस टीमकडून खेळतो. त्याला आयपीएल ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं 20 लाखांमध्ये खरेदी केलं आहे. पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये अनफिट विजय शंकरच्या जागी त्याला संधी देण्यात आली. सुदर्शननं आत्तापर्यत 8 टी20 मॅचमध्ये 217 रन केले आहेत.

गुजरातला राहुल तेवातियाने 3 बॉलमध्ये नाबाद 13 रन करत गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला. या आयपीएल मोसमात गुजरातनं अद्याप एकही मॅच गमावलेली नाही. त्यांची पुढील मॅच आता सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *