पुणेकरांनी खबरदारी घ्यावी एकूण शहरांमध्ये बऱ्याच भागात कोरोने पसरले पाय

Spread the love

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; पुणे : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या पुण्यामध्येच कोरोनाचे 104 रुग्ण आहे तर पुणे जिल्ह्यात आजपर्यंत 5 करोनाबाधित व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून काल रविवारी 5 एप्रिलला यातील 3 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागिरकांमध्ये भीती वाढली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना लागण झालेले सध्या 98 जण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खरंतर पुण्यातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत. तर सिंहगड रोडवर वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर -येरवडा, कल्याणीनगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *