कोरोना नावाच्या अजगराचा देशाला विळखा ;24 तासांत 32 जणांचा मृत्यू तर 639 जण पॉझिटिव्ह, रुग्णाची संख्या 4 हजार पार

Spread the love

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई, : कोरोना नावाच्या अजगराचा देशाला विळखा, भारतात कोरोनामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस हा आकडा झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजारवर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र तरीही अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचं गांभीर्य नागरिकांना लक्षात न आल्यानं हा धोका वाढताना दिसत आहे.

आतापर्यंत देशभरात कोरोनामुऴे 109 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशभरातून 9 हजार 369 लोकांच्या रक्ताचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 295हून अधिक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 89 हजार 534 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आल्यानंतर कोरोनाग्रस्तांची भारतातील संख्या 4 हजार 67 असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंतही ही आकडेवारी धक्कादायकच आहे. कोरोनाचा कहर थांबण्याच नाव घेत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 4 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यात केवळ 232 रुग्ण यशस्वी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 24 तासांत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *