महाराष्ट्रात उष्णतेची लाट; शाळेच्या वेळापत्रकात होणार बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा वाढलाय. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागानं (Meteorological Department) 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेची लाट वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आलाय.

या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळेची वेळ (School Schedule) कमी करण्याबाबत शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवत असल्यानं सध्या सुरु असलेली शाळेची 7 ते 12 ची वेळ बदलून 7 ते 10 करण्यात यावी, अशी सूचना पालकांनी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. weather update rain alert next 6 days in konkan western maharashtra
राज्यात तापमानात वाढ होत असून उन्हाचा कडाका वाढलेला आहे. विदर्भात सध्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील पाच दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. याबाबत नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

याच पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सीईओ यांच्याशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेत. हवामान विभागानं राज्यातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केलाय. हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेसंदर्भात नागरिकांना सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *