मी साहेबांचा चेला आहे, घाबरणार नाही पुरून उरेल – नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत, महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जुहू येथील आमचा ‘अधिश’ बंगला नियमानुसार आहे. फक्त टेरेसवर भाज्या लावल्या म्हणून मुंबई महानगरपालिकेने ते बेकायदेशीर ठरवले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री 2 हे अनाधिकृत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

नारायण राणे पुढे म्हणाले, आमचा जुहू येथील माझा बंगला नियमानुसार आहे. फक्त टेरेसवर भाज्या लावल्या म्हणून महानगरपालिकेने ते बेकायदेशीर ठरवले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री 2 हे अनाधिकृत होते, तरी देवेंद्र फडणवीसांनी त्याला मंजूरी दिली. महानगरपालिकेचे अधिकारी पैसे कमवत आहेत. मी सीबीआयला त्यांची नावे देणार आहे. मातोश्री 2 अनधिकृत होते, पण देवेंद्र फडणवीस यांनी ते मंजूर केले, त्यांचे आभार मानले पाहिजे. राणेंच्या केससाठी मोठे वकील दिले, पण मराठा आरक्षणावर वकील दिले नव्हते. मी साहेबांचा चेला आहे, घाबरणार नाही पुरून उरेल, असे नारायण राणे म्हणाले.

हे लोक राज्य चालवण्यास असमर्थ आहेत. सध्या ऐन उन्हाळ्यात राज्यात विजेचा तुटवडा होत आहे त्यावर काय? याआधी लोडशेडिंग नव्हते, मग आताच का? कारण 800 कोटींची थकबाकी कोळसा कंपन्यांची महाराष्ट्र सरकारने दिली नाही. अंधारात कुणाला रहावे लागेल जनतेला या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल करत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस, किरीच सोमय्या एकटे नाहीत. देशात भाजप मोठा पक्ष आहे. देशात भाजपची सत्ता आहे, राज्यात 105 आमदार आहेत. तुमचे 56 आहेत, पुढच्या वेळी निम्मेही येणार नाहीत. संजय राऊतांच्या स्वागतासाठी काल कार्यकर्ते नाचत होते, फ्लॅट जप्त झाला, म्हणून नाचत होते का? असे म्हणत कालच्या संजय राऊताच्या कालच्या शोभायात्रेवर नारायण राणेंनी टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांच्या कारवाईनंतर त्यांच्या स्वागतसाठी कोणती जनता संजय राऊत सोबत रस्त्यावर उतरली. एकही आमदार नव्हता फक्त एक खासदार दिसत होता. जो नेता उपस्थित होता, तो पगारधारी आहे. त्यामुळे संजय राऊत तुम्ही एकाकी पडले आहे.

जे पैसै यशवंत जाधव यांच्याकडे मिळाले, याचे उत्तर कोणाकडे नाही. या प्रश्नाचे उत्तर शिवसेना पक्ष प्रमुखांकडे देखील नाही. पैसे खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे. या सर्व मुद्यांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी संजय राऊत रोज काहीना काही आरोप लावत आहे. जाधवांकडे मिळालेले पैसे हे मुंबईतील जनतेच्या कराचे पैसे आहे. शिवसेनेने अनेक वेळा वेगवेगळ्या आंदोलनासाठी पैसे गोळा केले आहे. त्याचा हिशोब कधी पक्षाने दिला आहे का? असा प्रश्न नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *