![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । भारतात लाऊडस्पीकरच्या वापरावरून वाद सुरूच आहेत. महाराष्ट्र ते यूपीसह अनेक राज्यांमध्ये यावरून वाद निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला असताना राज्यात ठाकरे सरकारने लाऊडस्पीकरच्या वापरासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले की, महाराष्ट्र काही दिवसांत धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरला परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची शक्यता आहे.
लाऊडस्पीकर बंदीची मागणी करणारा भारत देश एकटा नाही
लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असून अनेक प्रदूषण नियंत्रण मंडळांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच जारी करण्यात आली आहेत. सध्या भारतात लाऊडस्पीकरचा वाद पेटला असून, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातील कासगंज आणि अलीगढसह इतर अनेक शहरांमध्ये धार्मिक स्थळांवर यावरून वाद निर्माण होत आहेत. मात्र, भारत एकटा नाही जिथे लाऊडस्पीकरबाबत वाद होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. इतर अनेक देशांमध्ये लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियमसह इतर अनेक देशांमध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत. नायजेरियामध्ये, काही शहरांमध्ये मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे.