![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे वाढताना दिसत आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात तफावत दिसून येत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.54 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 54,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 70,000 वर पोहोचला आहे.
तुमच्या शहरातील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर :
शहर दर
मुंबई 49860
पुणे 49890
नाशिक 49890
नागपूर 49890
दिल्ली 49850
कोलकाता 49850
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.