![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR दर वाढवला आहे. यामुळे सर्व मुदतीचे गृह कर्ज, वाहन कर्ज (MCLR) आणि इतर प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. त्याने MCLR मध्ये 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने चलनविषयक आढाव्यात रेपो दर 4 टक्के ठेवण्याची घोषणा केल्यानंतर स्टेट बँकेने (एसबीआय होम लोन) हा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रिझव्र्ह बँकेने बँकांना कर्ज देण्याचे दर बदलले नसतानाही एसबीआयने ही वाढ केली आहे. हा नवा दरही 15 एप्रिलपासून लागू झाला आहे. एसबीआयच्या नवीन दरांनुसार 1, 3 महिन्यांसाठी 6.75 टक्के, सहा महिन्यांसाठी 7.05 टक्के व्याजदर असेल. एका वर्षासाठी 7.10 टक्के, दोन वर्षांसाठी 7.30 आणि तीन वर्षांसाठी 7.30 टक्के व्याजदर लागू होईल. यापूर्वी, बँक ऑफ बडोदाने सर्व मुदतीसाठी कर्जाच्या दरात 0.05 टक्के वाढ केली आहे.
बँकेने सोमवारी जाहीर केले की त्यांनी 12 एप्रिल 2022 पासून निधी आधारित कर्ज दर (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवलेआहेत. या अंतर्गत, एका वर्षाच्या कालावधीसाठी कर्जाचा दर 7.35 टक्के वाढेल. बँकेने स्टॉक एक्सचेंजला कळवले की त्यांनी MCLR च्या पुनरावलोकनास मान्यता दिली आहे, जी 12 एप्रिल 2022 पासून लागू होईल. त्याचप्रमाणे, एक रात्र, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 0.05 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाच्या MCLR मधील वाढीमुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.