Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ ; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । एसटी संपाच्या आंदोलनाच्या उत्तरार्धाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. शरद पवार यांच्यावरील हल्लाप्रकरणी सुरू झालेली तुरुंगवासाची फेरी काही केला थांबताना दिसत नाही. मुंबईतल्या गिरगाव न्यायालयानेही सदावर्तेंना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. गिरगाव कोर्टात आज याबाबत युक्तिवाद पार पडला. विशेष म्हणजे यावेळी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200, 300 रुपये मी मर्जीनं घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी सांगावे. माझ्याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपैकी 48 हजार क्लायंट होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, सदावर्ते यांच्याविरोधात ठिकठिकाणी विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढताना दिसतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *